---Advertisement---

रोटरी क्लब अक्कलकोटच्या अध्यक्षपदी डॉ. विपुल शहा , सचिवपदी डॉ. प्रशांत वाली

By team
On: June 29, 2024 8:37 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दि.२८: रोटरी क्लब अक्कलकोटच्या अध्यक्षपदी डॉ. विपुल शहा यांची तर सचिवपदी डॉ. प्रशांत वाली यांची निवड करण्यात आली. सन २०२४-२५ या वर्षीच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. यामध्ये सर्वानुमते या निवडी पार पडल्या.

रोटरी क्लब ऑफ अक्कलकोट ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकोट शहर व परिसरात सातत्याने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवित असते. उपेक्षित व वंचितांसाठी रोटरी क्लबचे विविध प्रकल्प सातत्याने कार्यरत असतात. याही वर्षी नवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून डॉ. विपुल शहा, उपाध्यक्ष- सचिव डॉ.प्रशांत वाली’ कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद सुतार तर कार्यकारणी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष आनंद गंदगे, महेश जवळगी,
प्रकाश घिवारे,डॉ.बसवराज चिनकेकर, दिनेश पटेल,विलास कोरे,एम.जी बडोले जितेंद्रकुमार जाजू,निनाद शहा,अशोक येणेगुरे यांची निवड करण्यात आली आहे.रोटरी क्लबच्या माध्यमातून आगामी काळात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वंचितांसाठी, दिव्यांगासाठी व महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.विपुल शहा व सचिव डॉ.प्रशांत वाली यांनी सांगितले.रोटरी क्लबच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!