अक्कलकोट : शहर प्रतिनिधी
सध्या कौशल्यावर आधारित उद्योगांना खूप वाव आहे.त्या दृष्टीने समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च शिखर प्राप्त करावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
येथील लोकापुरे मंगल कार्यालयात वीरशैव माळी समाजातील अक्कलकोट शहर व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.नि.प्र.बसवलिंग महास्वामी हे होते. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, ठराविक क्षेत्राकडेच मुलांचा कल आहे तो त्यांनी बदलावा आणि ज्या क्षेत्रामध्ये वाव आहे. त्यामध्ये जाऊन नाव कमवावे आणि त्या क्षेत्रात उच्च शिखर गाठून समाजाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलताना म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी यांनी आशिर्वचनपर संदेशात विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी न सोडता अपार मेहनत करण्याचा सल्ला दिला.आयुष्यात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. यश आले म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आले म्हणून खचून जाऊ नका.
यावेळी वीरशैव माळी समाजातील विविध स्पर्धा परिक्षा,१० वी आणि १२ वी या महत्वपूर्ण परिक्षा मधील गुणवंत यशस्वी विद्यार्थांचे समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.याप्रसंगी डीआरडीओचे शास्त्रज्ञ राजेंद्र नाविदगी,डाॅ.संजीव फुलारी यांनी उच्च शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व्यासपीठावर दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,उद्योजक अप्पू पराणे,डाॅ.बसवराज चिणकेकर,डाॅ. दिपमाला अडवितोटे,डाॅ.शिवलीला माळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास वीरशैव माळी समाजातील शिवानंद बिंदगे परमेश्वर बोलदे, बाबुराव रामदे काशिनाथ बाळकृष्ण म्हेत्रे ईसापुरे, विजयकुमार हडलगी, शशिकांत लिबीतोटे,गुरु माळी, सिध्दाराम माळी गुरु म्हेत्रे,विश्वनाथ हडलगी, सुनिल इसापुरे,या सह नागरिक,महिला वर्ग,पालक,यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे, परमेश्वर देगाव यांनी आभार मानले