---Advertisement---

मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका ; मनोज जरांगे पाटील

By team
On: September 29, 2024 3:50 PM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

मराठ्यांचं आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, असा भाजप नेते अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शाह यांच्या या विधानावरून जरांगे यांनी शाह यांना थेट इशाराच दिला आहे.

पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केलं हे आम्हाला माहीत आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केलं? दमणमध्ये काय केलं? अंदमानमध्ये काय केलं हे आम्हाला माहीत आहे. स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केलं हे आम्हाला माहीत आहे. पण माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर केले. भयानक केले. प्रमोद महाजनांनी काय कमी केलं होतं? अडवाणी कुठे कमी पडले होते? कुठे मुरली मनोहर जोशी कमी पडले? अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे कुठे कमी पडले होते? सुषमा स्वराज कुठे कमी पडल्या? तुम्ही या लोकांना का मागे पाडलं? तुम्ही गोवा, कर्नाटक, हरयाणा आणि तामिळनाडूत तेच केलं. तुम्ही वातावरण ढवळून काढण्यापर्यंत काम केलं. तोगडियांनी काम नाही केलं? अशोक सिंघलांनी काम नाही केलं? त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ का आणली? त्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही पक्ष आणि आंदोलन कसं हाताळतात हे सर्वांना माहीत आहे. मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून. तुम्ही कुणालाही सोडलं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!