---Advertisement---

कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नका !

By team
On: March 10, 2025 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मेष

श्रीगणेश म्‍हणतात की, आज मित्र आणि नातेवाईकांसोबत महत्त्‍वाच्‍या विषयावर चर्चा होईल. व्यक्तिमत्त्वात अधिक सकारात्मक बदल होतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नका. निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते याची जाणीव ठेवा. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल विचारपूर्वक करा.

 

वृषभ

श्रीगणेश सांगतात की, आज संवाद कौशल्‍याने तुमचा प्रभाव टिकवून ठेवाल. कुटुंबातील महत्त्‍वाच्‍या प्रश्‍न चर्चेतून सोडविण्‍यास प्राधान्‍य असेल. तुमच्या गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर केल्‍यास अपेक्षित यश मिळेल; पण अहंकाराची भावना नुकसानकारक ठरेल. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार मार्गी लागतील.

 

मिथुन

श्रीगणेश म्‍हणतात की, आज आर्थिक नियोजनास महत्त्‍व द्‍याल. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्‍याची संधी मिळेल. जास्त खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असेल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून त्यांची काळजी घ्या. व्यवसायात अंतर्गत सुधारणा किंवा स्थान बदलण्याची आवश्यकता आहे.

 

कर्क

आज गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये वेळ घालवला जाईल आणि तुम्हाला त्यात यश देखील मिळेल. खर्च जास्त असेल त्‍याचबरोबर उत्पन्नाचा स्रोत देखील वाढणार आहे. कुटुंबातील कामांबरोबरच सामाजिक कार्यातसही सहभागी व्‍हाल. जास्त स्वकेंद्रितपणा तुमच्या नात्याला बिघडू शकतो, याची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रात प्रभावशाली व्यक्तीचे योगदान तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही नवीन यश मिळवून देऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात.

 

सिंह

आज अचानक अनोळखी व्यक्तीची झालेली भेट खूप फायदेशीर ठरेल. मालमत्ता विक्रीची योजना असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांच्‍या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. न्‍यायालयात प्रलंबित प्रकरण असेल तर योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, मार्केटिंग संबंधित सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. पती-पत्नीमधील नात्यात गोड वाद होऊ शकतो. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

 

 

कन्या

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही तुमच्या कार्याप्रती पूर्णपणे समर्पित असाल. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करत आहे. कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन असेल. नकारात्मक विचारांचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. आत्‍मचिंतनात थोडा वेळ व्‍यतित करा. व्यावसायिक कामांकडे तुमचे पूर्ण लक्ष द्या. आरोग्य उत्तम राहील.

 

 

तूळ

श्रीगणेश सांगतात की, आज बहुतांश वेळ सामाजिक व राजकीय कामात व्‍यतित होईल. मुलाच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने सोडवल्यास यश मिळू शकते. घरातील वडीलधाऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील.

 

वृश्चिक

श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करण्याचे नियोजन सुरू कराल. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुम्ही योगदान द्याल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत कोणताही वाद वाढू शकतो. पैशाशी संबंधित कामे करताना काळजीपूर्वक विचार करा. रागावरही नियंत्रण ठेवा. सध्या कामाच्या क्षेत्रातील कामे पूर्वीसारखीच सुरू राहतील.

 

 

धनु

आज तुम्ही सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल; पण तुमच्या काही व्यत्यय येण्‍याची शक्‍यता आहे. पण प्रयत्‍न कायम ठेवल्यास कार्यपूर्ती होईल. व्‍यवसायातील कामे सुरळीत पार पडतील. आरोग्‍य चांगले राहिल.

 

मकर

आज धार्मिक कार्यातील सहभाग तुम्‍हाला मनशांती मिळवून देईल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित योजना असतील. कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे करताना अधिक काळजी घ्या. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. व्यावसायिक क्रियाकलाप सामान्य राहतील.

 

कुंभ

आज तुमची बहुतांश कामे योग्यरित्या पूर्ण होतील. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंधांमध्ये अधिक सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक जीवनात विभक्त होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. उत्पन्नाच्या साधनांमध्ये घट होऊ शकते. व्यावसायिक कामांमध्ये लक्ष देणे खूप महत्वाचे आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

 

मीन

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईकही तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करतील. मुलांना मिळालेल्‍या यशामुळे घरात उत्सवाचे वातावरण राहील. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन कार्यक्षेत्रातील अनेक बाबी सोडवण्यास सक्षम असेल. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहिल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!