---Advertisement---

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : संशयित आरोपीच्या जमीन अर्जावर उद्या सुनावणी !

By team
On: June 8, 2025 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहरातील डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक वळण असतांना आता याच प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष सोमवारी (दि. 9) म्हणणे सादर करणार आहे. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल.

मनीषाच्या जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी सरकार पक्षाने आत्तापर्यंत तीन वेळा मुदत वाढवून घेतली. म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे नाहीत ती मिळविण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण सरकार पक्षाने न्यायालयात दिले. 28 एप्रिल रोजी म्हणणे मांडण्याची शेवटची तारीख होती. परंतु सरकार पक्षाने पुन्हा तारीख मागितली. 8 जूनपर्यंत न्यायालयास सुट्टया आहेत. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश कटारीया यांनी 9 जून तारीख दिली. त्यानुसार आता सरकार पक्ष सोमवारी म्हणणे मांडणार आहे. या दिवशी सरकार पक्षाने पुन्हा मुदत घेतल्यास मनीषाच्या वकिलांकडून त्यास हरकत घेण्यात येणार आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस येत्या 18 तारखेला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन चार्टशीट दाखल करण्यासाठी तयारी करीत आहे. चार्टशीट दाखल होईपर्यंत मनीषाला जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!