---Advertisement---

डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी ट्विस्ट

By team
On: April 20, 2025 1:58 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला. वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे- माने यांना शहर पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले. याविषयी डॉ. अश्विन शिरीष वळसंगकर यांनी फिर्याद दिली आहे.

हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्या महिलेवर कारवाई करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्याने तिने वारंवार ई मेल करून डॉ. शिरीष वळसंगकर यांना धमकी वजा मेल पाठवले. यामुळे वडिल डॉ. शिरीष यांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरी बाथरूम मध्ये पिस्तूलने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.सोलापुरात सदर बाजार पोलिसांनी काल (शनिवारी) रात्रीच न्यायालयाच्या खास परवानगीने या महिलेस ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!