ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दसरा मेळाव्याची चाहूल : हरियाणात जे झाले ते राज्यात‎ होणार नाही : जरांगे पाटील‎

जालना : वृत्तसंस्था

राज्यात नवरात्राची मोठी धामधूम सुरु असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत असतांना नुकतेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार ‎‎बीड जिल्ह्यातील नारायणगडावर, १२ ‎‎ऑक्टोबरला दसरा मेळावा पार पडत ‎‎आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील ‎‎प्रत्येक जिल्ह्यातून समाजबांधव‎जाणार आहेत. जालन्यातील मराठा ‎‎बांधवांची पूर्वतयारी बैठक गुरुवारी‎पार पडली आहे. जालना जिल्ह्यातून‎९ हजार चारचाकी वाहनांतून, लाखो ‎‎समाजबांधव जाणार आहेत. तसेच ‎‎स्वतःचे जेवणही ते सोबत घेऊन ‎‎जातील, याचे नियोजन केले.‎

मराठा समाजातील तरुणांनी ‎‎गावपातळीवर बैठका घेऊन, ‎‎मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने ‎‎सहभागी होण्याचे आवाहन केले‎आहे. प्रत्येक कुटुंबातून एकजण या‎मेळाव्याला जाईल, असा निर्णय‎अनेक गावांमध्ये घेण्यात आला‎आहे. मेळाव्याला जाण्यासाठी‎जालना जिल्ह्यातील तालुकानिहाय,‎गावनिहाय बैठका पार पडल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आहेत. अनेकांनी कुणी वाहनांसाठी‎पेट्रोल तर कुणी मोफत प्रवासासाठी‎मदत केली आहे. दुचाकी, चारचाकी‎वाहनातून बीडकडे जात असताना‎कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी,‎वाहतूक खोळंबणार नाही असे कृत्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करणार नाही याबाबत निर्णय घेण्यात‎आला आहे. या मेळाव्याला जाणार‎असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी‎होणार आहे. गुरुवारी पार पडलेल्या‎बैठकीप्रसंगी प्रत्येक तालुक्यातील‎पदाधिकारी उपस्थित होते.‎

हरियाणा आणि महाराष्ट्राची परिस्थिती‎वेगळी आहे, त्यामुळे जे तिथे झाले ते इथे हाेणार नाही.‎आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांना आरक्षण द्या.‎मराठ्यांना आरक्षण देण्याआधी तुम्ही आचारसंहिता‎लावली, तर मग तुम्हाला कचका दाखवतो. तुमचे‎‎सगळे पाडतो, असा इशारा मनोज‎‎जरांगे यांनी महायुती सरकारला‎‎दिला. जरांगे पाटील यांनी गुरुवारी‎‎आंतरवालीत संवाद साधला.‎‎सरकारने या जातींना ओबीसीत‎‎घेताना मविआकडून लिहून घेतले‎आहे का, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र‎फडणवीस यांनी मराठ्यांचा खेळ संपवला. नव्या १५‎जाती ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस राज्य‎सरकारने केंद्राकडे केली आहे. याचा जरांगे यांनी‎चांगलाच समाचार घेतला. आता ओबीसी नेते झोपले‎आहेत का, येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठे आहे, आता‎या जातींना विरोध का केला नाही, असे प्रश्न विचारत‎जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली. तर गिरीश‎महाजन यांचाही समाचार घेतला.‎

मेळाव्याविषयी जनजागृती‎करण्यासाठी समन्वयकांनी छत्रपती‎संभाजीनगरात ३५ बैठका घेतल्या.‎त्यानुसार २ हजारांपेक्षा अधिक‎वाहने नारायणगडावर जाणार आहेत.‎राज्य सरकारने ओबीसी आरक्षणात‎१५ जातींचा समावेश करण्याची‎शिफारस केंद्र सरकारकडे केली. या‎निर्णयाचे मराठा समाजाने स्वागत‎केले आहे. मेळाव्यानंतर पुढील‎व्यूहरचना आखली जाईल, अशी‎माहिती सुरेश वाकडे यांनी दिली.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!