---Advertisement---

राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !

By team
On: July 29, 2025 4:35 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली आहे.

कालच त्यांनी वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता. आता दुसऱ्याच दिवशी अनिलकुमार पवार यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ईडीने वसई-विरार परिसरात बेकायदेशीर राहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे.  डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहे. वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांसंर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. या पूर्वीही ईडीने या प्रकरणात 13 ठिकाणी छापेमारी करून तब्बल 9 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!