ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : राज्यात निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षात जोरदार इन्कमिंग होत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून उमेवारांची घोषणा केली जाईल, असा सूर आवळला जात आहे. पण उमेदवार देण्यावरून महायुतीची वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगितले जात असले तरी मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्यात आता अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असून, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ही रणनिती ठरली असल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत एकनाथ शिंदेंनी निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व/ पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जिल्हाप्रमुख मंत्री आमदारांची बैठक व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वंतत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जिल्ह्यांमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढतील अशी शक्यता धुसर मानली जात असल्याची चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!