---Advertisement---

मोहोळध्ये खळबळ : कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार !

By team
On: June 15, 2025 11:12 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय अंदाजे 30, रा. गल्ली क्र. 23/ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार शेख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पुणे शहरातील पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, घरफोडी, दरोडा अशा स्वरूपाचे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCA) अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र तो गेली काही दिवस फरार होता. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की शेख लांबोटी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसला आहे. त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचने मोहोळ पोलिस ठाण्याच्या सहाय्याने शनिवारी रात्री लांबोटी येथे संयुक्त कारवाई केली.

शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी जसा घेराव घातला, तसे त्याने आपल्याकडील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्वरित प्रत्युत्तरात गोळीबार केला. या चकमकीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून शेखच्या अन्य गुन्हेगारी कृत्यांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे लांबोटी गावासह मोहोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीवर कारवाई झाल्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!