---Advertisement---

सोलापुरात खळबळ : दादांच्या तरुण नेत्याचा चारचाकीत आढळला मृतदेह !

By team
On: June 9, 2025 5:15 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील मुरारजी पेठ परिसरातील पापय्या तालीमजवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२) या युवा नेत्याचा मृतदेह बंद कार मध्ये आढळून आला आहे. रविवारी रात्री घरासमोरील कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने आत्महत्या का केली याचा तपास सोलापूर पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सोलापुरातील युवा नेता ओंकार हजारे रविवारी दुपारी कारमध्ये बसला होता. त्यानंतर तो बाहेरच आला नाही. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तो सीटवर निपचित पडला होता. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढले गेले. यानंतर नातेवाईकांनी ताबडतोब ओंकारला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी ओंकार हजारेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!