---Advertisement---

सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन

By team
On: April 19, 2025 9:09 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरी त्यांनी स्वतःच डोक्याला बंदुकीची गोळी झाडून घेतली त्यात त्यांचा म्रुत्यु झाला. अत्यंत हुशार, संयमी आणि तत्वनिष्ठ डाँक्टर अशी डॉ. शिरीष वळसंगकर यांची ओळख होती. वैद्यकीय व्यवसाय हा धंदा नसुन धर्म आहे असे मानून रुग्णांवर उपचार करणारे ते डाँक्टर होते. सोलापुरातील रामवाडी भागात अतिशय सुसज्ज असे हाँस्पीटल त्यांनी बांधले.

अलिकडेच या हाँस्पीटलचे नुतनीकरण झाले होते. गेले काही महिने ते हाँस्पीटलला कमी येत असे. परंतू अनेक रुग्णांना तेच हवे असायचे तेव्हा मात्र ते आवर्जून येत असत. रुग्णांची, नातेवाईकांची अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्रक्रिया करुन हजारो रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवले. दुसऱ्यांचे प्राण वाचावे म्हणून प्रयत्नांची शिकस्त करणारे डॉ. शिरीष वळसंगकर आज स्वतःचा प्राण स्वतःच्या हाताने क्षणार्धात संपवतात ही अतिशय धक्कादायक घटना आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची मोठी हानी झाली आहे त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सोनामाता शाळेशेजारील निवासस्थानी सकाळी ११ वाजल्यापासून ठेवण्यात येणार असून दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!