---Advertisement---

करमाळानजीक चारचाकीचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू तर चौघे जखमी !

By team
On: May 14, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील वरकुटे जवळ दि. १३ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. बेंगलोर येथे वडीलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत येत असताना झालेल्या रस्ते अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षद झंकार योगी (वय ३५) असे त्याचे नाव आहे.

या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दिनेश हिरा नाथयोगी (वय ४०), कृष्णा गोरबहादुर कुवर (वय ५०), पुष्कर झंकर योगी (वय ३०) तिघेही (रा. वापी, गुजरात) व निशा हर्षद योगी (वय ३५, रा. बेंगलोर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात झाला.

याबाबतची माहिती अशी की, गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बेंगलोर येथे रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या झंकर योगी यांचे अंत्यविधी उरकून परत गावी गुजरातकडे निघाले होते. यावेळी कुर्डूवाडी वरून येत असताना वरकुटे नजीक कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली. यामध्ये योगी यांचा मुलगा जागीच ठार झाला तर चार जण जखमी झाले.

या अपघाताची खबर स्थानिकांनी पोलिसांना दिली. यावेळी मेजर आनंद पवार, हवालदार आप्पा लोहार, सतीश इंगोले, व माजी सैनिक ॲम्बुलन्स चालक साजिद शेख यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. तेथील मयत व जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोघा गंभीर जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. इतरांवर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार चालू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!