---Advertisement---

राज्यसभेच्या १२ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार निवडणूक

By team
On: August 7, 2024 4:27 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आता राज्यसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे. तब्बल १२ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील दोन जागा या राज्यातील आहेत. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख देखील जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार हे लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुंबईतील पियुष गोयल हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्याने या दोन जागांवर देखील निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १२ जगासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १४ ते २१ |ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर २६ ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर ३ सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!