मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते. सुप्रीमकोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल, असं म्हणत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेमध्ये अनिल देशमुख यांनी १०० कोटी गोळा करण्याचे सांगितले होते,असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.एवढंच नाही तर या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी परमबिर सिंग यांनी केली आहे.