---Advertisement---

चार दिवसाच्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील ८ जणांचा घेतला बळी !

By team
On: September 24, 2025 11:00 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठवाडा भागात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लातूरमध्ये ३, बीडमध्ये २, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू वीज पडणे, पाण्यात बुडणे आणि इतर अपघातांमुळे झाले आहेत.

पावसामुळे ७६६ घरांचे नुकसान झाले असून, ३३,०१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील पाच धरणे, अनेक रस्ते, पूल आणि शाळांचेही नुकसान झाले आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ८ मृत्यू कोलकात्यात, तर ९ जणांचा मृत्यू वीज पडल्याने झाला आहे.

कोलकात्यात २५१.४ मिमी पाऊस झाला असून, गेल्या ३९ वर्षांतील सर्वाधिक एकदिवसीय पाऊस असल्याची नोंद आहे. अनेक भाग २ ते ३ फूट पाण्याखाली गेले असून, ३० हून अधिक विमान उड्डाणे आणि अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालये २५ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!