---Advertisement---

राज्यात फळभाज्या महागल्या !

By team
On: October 13, 2025 10:13 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात फळभाज्या महागल्या असून आता मध्य प्रदेशातून येणाऱ्या लालचुटुक अन गोड गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गाजराची आवक घटली आहे. सद्यस्थितीत स्थानिक भागातूनही गाजराची आवक होत आहे. मात्र त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गाजराच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती. आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, आले आणि फ्लॉवरच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवडयाच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि.12) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश मध्यप्रदेश हिरवी मिरची 14 ते 15 टेम्पो, इंदौर येथून गाजर 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 300 ते 350 क्रेट, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमूग 4 ते 5 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 9 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 45 ते 50 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 3 ते 4 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुग शेंग 50 ते 60 गोणी, मटार 350 ते 400 गोणी, तांबडा भोपळा 14 ते 15 टेम्पो, कांदा सुमारे 80 ते 90 टेम्पो, स्थानिक भागातून बटाटा 45 ते 50 गोणी इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पावसामुळे पालेभाज्यांचे उत्पानावर परिणाम झाल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. तुलनेने मागणी जास्त आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेले पालेभाज्यांचे भाव टिकून होते. गुलटेकडी मार्वेटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.12) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 30 हजार जुडींची आवक झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!