नागपूर : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना अनेक विरोधक सत्ताधारी गटावर टीका टिपण्णी करीत आहे पण सध्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं विधान केलंय. भाजपातल्या काही लोकांना नितीन गडकरींची अडचण होत आहे. त्यामुळे ते त्यांना बाजूला करण्याचा घाट घालत आहेत. मात्र, गडकरी बाजूला व्हायला तयार नसल्याने त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे काही लोक रचत असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
यासाठी नागपुरातील काही अधिकाऱ्यांना पकडत त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचं वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. ते काल रात्री अकोल्यात मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यात राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा धडाका सुरूच आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची कॉर्नर सभा पार पडली. या सभेत मुस्लिम समाजाशी संवाद साधताना आंबेडकर म्हटलंय की, यंदा मुस्लिम म्हणूनच तुम्हाला वोटिंग करावी लागणार आहे.
गडचिरोली आणि भंडारा वगळता प्रत्येक लोकसभेमध्ये मुस्लिम ‘दीड लाख’ आहे. त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिमांनी मुस्लिम म्हणूनच मतदान केलं तर त्यांना निवडणुका जिंकता येतील, असं वक्तव्य त्यांनी अकोल्यातील आयोजित मुस्लिम समाज संवाद मेळाव्यात केलं आहे.






