---Advertisement---

२४ तासांपासून गणेश विसर्जन मिरवणुक सुरु !

By team
On: September 7, 2025 10:05 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक शहरात भव्य मिरवणूक निघाली होती तर पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष अजूनही कायम असून, गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह गेल्या २४ तासांपासून सुरू आहे. शहरातील तीन प्रमुख मार्गांवर मिरवणुका अजूनही सुरू आहेत. टिळक चौकात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत आहे.

यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक एक तास आधी सुरू झाली, आज दुपारी ३ वाजेपर्यंत ती संपण्याची शक्यता आहे. अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी आहे. यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता आहे. काल सकाळी ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरू झाली होती. डीजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेले रथ, तसेच हिंदी गाण्यांवर थिरकणारी तरुणाई मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अनेक मंडळांमध्ये अंतर वाढल्यामुळे मिरवणुका रात्री उशिरापर्यंत रेंगाळल्या होत्या. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होती.

दांडेकर पुलावरील आझाद मित्र मंडळाच्या गणपतीची मिरवणूक दुपारी दीड वाजता ग्राहकपेठ चौकात दाखल झाली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता सदाशिव पेठेतील अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या शिस्तबद्ध मिरवणुकीने आणि आकर्षक गजरथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्राहकपेठेचा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता आली. पारंपरिक वाद्ये, शिस्तबद्धता आणि महिला वादकांचा सहभाग हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!