---Advertisement---

बारावीच्या परीक्षेत राज्यात मुलीच ठरल्या अव्वल !

By team
On: May 6, 2025 9:40 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील बारावीच्या परीक्षेत मुलीनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 1.49 टक्क्याने घट झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १4 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत पंधरा दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते.

  • मुलींचा निकाल – 94.58 टक्के
  • मुलांचा निकाल – 89.51 टक्के
  • मुलींचा निकाल मुलांपेक्षा 5.07 टक्केने अधिक आहे.

कोकण विभागाचा सर्वाधिक 96.74 टक्के, सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के आहे.

विभागनिहाय निकाल

  • पुणे – 91.32
  • नागपुर – 90.52
  • छत्रपती संभाजीनगर – 92.24
  • मुंबई – 92.93
  • कोल्हापूर – 93.64
  • अमरावती – 91.43
  • नाशिक – 91.31
  • लातूर – 89.46
  • कोकण – 96.88

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!