ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१५ एप्रिल रोजी गोकुळ शुगर सर्व बिले अदा करणार-चेअरमन दत्ता शिंदे

मार्च एंड व इतर बाबींची पुर्तता करण्यात कारखाना प्रशासन व्यस्त

चपळगांव : प्रतिनिधी

धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने मागील ऊस हंगामातील बिलांची पूर्तता येत्या १५ एप्रिल रोजी करण्याचे ठरवले आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.

शिंदे यांनी सांगितले की, गेल्या काही काळातील तांत्रिक अडचणींमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती, परंतु कारखाना प्रशासन व कर्मचारी या समस्येवर लक्ष केंद्रित करून काम करत आहेत. मार्च एंडमुळे थोडीशी कसरत करावी लागत आहे, तरीही सर्व बिलांची पूर्तता वेळेत करून शेतकरी व इतर पुरवठादारांची बिले अदा केली जातील. शिंदे यांनी शेतकऱ्यांचे सहकार्य यापूर्वीही महत्वाचे असल्याचे सांगितले आणि पुढील काळातही अशीच मदत अपेक्षित असल्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!