जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत असून या दोन दिवसांत ती तीन हजार रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारी ९१ हजार रुपयांवर आल्यानंतर शनिवारी पुन्हा चांदीत एक हजार रुपयांची घसरण झाली व ती ९० हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. दुसरीकडे, सोन्याच्याही भावात दोन दिवसांत ९०० रुपयांची घसरण होऊन ते शनिवारी ७३ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
गेल्या १० दिवसांपासून चांदी ९२ ते ९३ हजार रुपयांदरम्यान राहत आहे. गुरुवारपर्यंत ९३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) दोन हजार रुपयांची घसरण झाली व ती ९१ हजार रुपयांवर आली. त्यानंतर शनिवारी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी २० हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. १७ दिवसांतील हे कमी भाव असून यापूर्वी ३ जुलै रोजी चांदी ९० हजारांवर होती.
दुसरीकडे, गुरुवारी (१८ जुलै) ७४ हजार ५०० रुपये प्रतितोळ्ळ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) ७०० रुपयांची, तर शनिवारी पुन्हा २०० रुपये अशी दोन दिवसांत एकूण ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने ७३ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.