---Advertisement---

धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच : अनेकांचे खरे मुखवटे उघड होतील !

By team
On: July 21, 2024 9:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण देखील केले आहे. ते म्हणाले कि, मी चित्रपट काढला तर अनेकांचे खरे मुखवटे उघड होतील असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हणाले की, आताच्या घडामोडींपर्यंत चित्रपट आला असेल तर माझे पात्र त्यात आहे का? यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुमचे पात्र ‘धर्मवीर 3’ मध्ये आहे. यानंतर फडणवीस यांनी स्वतःचा चित्रपट काढायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ”धर्मवीर चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाचा दुसरा भाग येईल असे कोणाला वाटले नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचे भाग दोन येणार असल्याचीही कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती”, असे फडणवीस म्हणाले.

 

 

 

तसेच फडणवीस म्हणाले, ”विचारांशी गद्दारी झाली म्हणून एकनाथ शिंदे सरकार सोडून बाहेर आले. पण दुर्दैवाने त्यांना गद्दार म्हणून हिणवले गेले. पण ज्यावेळी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीशी असते, तेव्हा कितीही हिणवले गेले, तरी देखील खरे सोने काय आहे, हे महाराष्ट्राची जनता हेरते आणि शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!