---Advertisement---

सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ !

By team
On: July 4, 2025 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 9 जुलैच्या दरम्यान काही देशाविरोधात एकतर्फी आयात शुल्क लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक व्यापारात पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू लागला आहे. इस्त्रायल- इराण युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढली होती.

हे युद्ध थांबल्यानंतर ही गुंतवणूक कमी होऊन सोने आणि चांदीचे दर कमी होत होते. आता नऊ जुलै जवळ येत असल्यामुळे पुन्हा या दोन धातूच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचा दर गुरुवारी 450 रुपयांनी वाढून 99,620 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दर एक हजार रुपयांनी वाढवून 1 लाख 5 हजार 800 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलर पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक साधन म्हणून डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यांचे आकर्षण कमी झाले आहे, तर सोने आणि चांदीचे वाढले आहे. त्यामुळे या दोन धातूच्या दरात वाढ होत असल्याचे मेहता इक्विटीज या कंपनीचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी सांगितले. ते म्हणाले की, डॉलर सध्या साडेतीन वर्षाच्या निचांकावर असून अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा दोन महिन्याच्या निचांकावर गेला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!