---Advertisement---

सोन्याच्या दरात पुन्हा उसळी ; सराफा बाजारातही वाढ

By team
On: July 22, 2025 3:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सोन्याच्या किमतीत अलीकडे घसरणीचे संकेत मिळत असतानाच पुन्हा एकदा या मौल्यवान धातूमध्ये तेजी आली आहे. वायदा बाजारात सोन्याचा भाव तब्बल ₹500 ने वाढला, तर सराफा बाजारातही ₹100 ने महागाई झाली आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या खरेदीत ग्राहकांच्या खिशावर ताण येणार, हे निश्चित आहे.

मंगळवार, दि. २२ जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,00,160 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे.
त्याचवेळी इतर प्रकारांच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत:

  • 22 कॅरेट सोनं (10 ग्रॅम): ₹91,810
  • 18 कॅरेट सोनं (10 ग्रॅम): ₹75,120

दुसरीकडे, चांदीच्या दरात ₹100 ची घट झाली आहे. या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांनाही सतर्क राहावे लागत आहे.

वायदा बाजारात दिवसाची सुरुवात घसरणीने झाली असली, तरी एक तासातच दर 500 रुपयांनी वधारले. यामागे स्थिर अमेरिकन डॉलर आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेचा प्रभाव असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!