---Advertisement---

सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या नवीन दर

On: November 18, 2020 6:33 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली । सन आटोपताच सोने चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे.  बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घट झाले.तर चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत  532 रुपयांनी खाली आली आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाले होते. मंगळवारी चांदीची किंमत 63,171 रुपये होती.

सोन्याच्या नवीन किंमती

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या नवीन सोन्याची किंमत आता प्रति 10 ग्रॅम 50,253 रुपये आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर पती 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,882 डॉलर झाली आहे.

 चांदीच्या नवीन किंमती

चांदीची चर्चा केली तर आज त्यातही घट नोंदली गेली. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 532 रुपयांनी घसरली. त्याची किंमत 62,639 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी बुधवारी प्रति औंस 24.57 डॉलरवर बंद झाली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!