---Advertisement---

भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्ण संधी; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

On: February 22, 2021 2:02 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली: भारतीय डाक विभागात तरुणांना नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पोस्ट विभाग, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर ४४ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी भरती
स्टाफ कार ड्राईव्हर: स्टाफ कार ड्राईव्हरच्या ९ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. त्यासाठी १८-२७ वर्षाची अट आहे. १० वी पासची अट असून यासाठी १९९००-६३२०० वेतन असणार आहे.

Despatch Rider: ६ च्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी 8 वी पासची अट आहे. १९९००-६३२०० वेतन आहे.

असा करावा अर्ज: वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, सी -१२१, नरैना इंडस्ट्रियल एरिया फेज -१, नरैना नवी दिल्ली, पिनकोड- ११००२८

ही आहे शेवटची मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत अर्ज करावयाचा. ४ एप्रिल २०२१पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!