---Advertisement---

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन

By team
On: June 12, 2024 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक येतात. अनेक भाविक स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. या भाविकांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासातदेखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. याद्वारे यात्रा काळामध्ये १८ लाख ३० हजार ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती. यंदा ही संख्या वाढेल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे. वाहकाकडन तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!