---Advertisement---

हगवणे परिवाराचा नवा पराक्रम : चित्रपट दिग्दर्शकाला धमक्या देत केली लाखोंची फसवणूक !

By team
On: May 31, 2025 10:39 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवार चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष हगवणेसाठी त्यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला धमकावले होते. याबद्दलची माहिती दिग्दर्शक अविनाश खोचरे यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच हगवणे यांच्याकडून जेसीबी व्यवहारात जेसीबी खरेदी करणाऱ्यास 11 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.

राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे याने ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचे हगवणे यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. तसेच या चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. हगवणे यांच्याकडून आपल्याला सातत्याने धमक्या येत होत्या, त्यासंदर्भात अविनाश खोचरे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार देखील केली होती. तसेच पुणे पोलिस आयुक्त कार्यालयातही लेखी तक्रार दिली होती. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या चित्रपटात राजेंद्र हगवणे यांची गाडी देखील वापरण्यात आली होती. तसेच पुतण्या संतोष हगवणे याने दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना पिस्तूल दाखवत दमही भरला होता. माझे मामा पोलिसमध्ये मोठ्या पदावर आहेत, एटीएसमध्ये आहेत, तू माझे काहीच करू शकत नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा दबाव टाकून हगवणे यांनी आणखी एकाला दम दिल्याचे समोर आले आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपी पती शशांक हगवणे यांचे मामा पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांना आता महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी सुपेकर यांच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने परिपत्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज बदली केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!