---Advertisement---

‘त्या’ जीआर विरोधात सुनावणीस हायकोर्टाचा नकार !

By team
On: September 22, 2025 1:36 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हैदराबाद गॅझेटियर ‘जीआर’ विरोधातील याचिकेवर सुनावणीस आज (दि. २२) मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी एने गणेशोत्‍सवात मुंबईत मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी बेमुदत उपोषण केले. पाच दिवसांनंतर राज्‍य सरकारने त्‍यांनी केलेल्‍या हैदराबाद गॅझेटियरला मान्‍यता देण्‍या मागणी मान्‍य केली. राज्‍य सरकारने हैदराबाद गॅझेटियरला मान्‍यता देणारा शासन आदेश काढला. या आदेशाविरोधात २ सप्‍टेंबर रोजी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात आल्‍या होत्‍या. आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाचा या याचिकांवर सुनावणीस नकार दिला. तांत्रिक कारणांमुळे खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!