अक्कलकोट : प्रतिनिधी
हो ची मिन्ह, व्हिएतनाम: डॉ. नमिता कोहोक यांना व्हिएतनाम अचिएव्हर्स अवॉर्ड २०२४ मध्ये “वुमन ऑफ वर्ड्स” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पॉल नरुला अकादमी थायलंड आणि महेज फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. डॉ. कोहोक यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मुंग थान ग्रँड हॉटेल, हो ची मिन्ह सिटी, व्हिएतनाम येथे प्रदान करण्यात आला. हा त्यांचा एकूण ६९ वा पुरस्कार आहे.
डॉ. कोहोक यांनी आतापर्यंत जगभरात ६०० हून अधिक मोटिवेशनल टॉक सेशन्स , प्रेरणा दायी व्याखाने झाली आहेत , सकारात्मकता आणि कॅन्सर जागरूकता पसरविण्यामध्ये त्या २३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत . कॅन्सर ते क्राउन , सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास या प्रवासाबद्दल बोलताना, त्या श्रोत्यांना नेहमीच प्रेरित करतात. एक प्रेरणादायी वक्त्या म्हणून त्यांची ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे.
हा पुरस्कार त्यांना डॉ. सवकुर संजय (एमडी, पीपल्स कौन्सिल, शिकागो, यूएसए), मेघना नायडू (कन्नड चित्रपट अभिनेत्री), डॉ. नागुएन नगोक थो (उपाध्यक्ष, व्हिएतनाम फाउंडेशन फॉर द स्पेशली एबल्ड), श्री. चूहियन (सामाजिक कार्यकर्ते, कंबोडिया) आणि डॉ. एम.ए. मुम्मिगट्टी (अध्यक्ष, युनिव्हर्सल फिल्ममेकर्स कौन्सिल) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. कोहोक यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले, “माझे कार्य असेच चालत राहणार. आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.” त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.