---Advertisement---

…मी पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो ; एकनाथ शिंदेंनी हाणला ठाकरेंना टोला !

By team
On: April 26, 2025 5:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही शिक्षण झाले नसले तरी 2022 साली परीक्षा देण्यासाठी मी गुवाहाटीला गेलो होतो, असे ते म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पालघरमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, मी बारावीनंतर शिक्षण सोडले. पण मुलाला डॉक्टर केले. कारण, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफूल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षणावर विशेष भर दिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण हा त्याचाच एक परिपाक आहे. शिक्षकांना वंदन करायचे नाही, तर कुणाला करायचे?

शिक्षक आपल्या सर्वच वैयक्तिक समस्या पोटात घालून भावी पिढ्यांना घडवण्याचे काम करतात. त्यामुळे ते महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची भावी पिढी घडवणारे खरे शिल्पकार आहेत. आई-वडिलांनंतर शिक्षकांचाच व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पेसा शिक्षक निर्णय पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत निकाली लागण्याचेही संकेत दिले.

एकनाथ शिंदे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, माझे फार काही शिक्षण झाले नाही. पण लोकांमध्ये मिसळल्यानंतर मला खरे शिक्षण मि्ळाले. मी डॉक्टर नाही. पण छोटी-मोठी ऑपरेशन करोत. शिक्षण नसले तरी मी 2022 मध्ये परीक्षा देण्यासाठी गुवाहाटीला गेलो होतो. आता थोडे फार शिल्लक राहिले आहे. ते ही लवकरच पूर्ण होईल. आम्ही प्रिंटिंग मिस्टिकवाले नाही, तर वचननाम्यानुसार आश्वासन पाळणारे आहोत.

गुरू प्रत्येकाला लागतो. गुरूशिवाय काही नाही. समाजाचा दोष दूर करण्यासाठी गुरू हवा असतो. शिक्षक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कुणाला पुढे न्यायचे? कुणाचा टांगा पलटी करायचा हे आम्हाला माहिती आहे. शिक्षक आमदार शिक्षकांच्या समस्या सोडवतील. मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. पण महाराष्ट्रातील जनतेला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!