मैंदर्गीत विद्यार्थिनींना स्वखर्चातून दिले मोफत कपडे
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बगगीतून मिरवणूक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी मैंदर्गी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत स्वखर्चातून गणवेश आणि बॅगचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले.स्वखर्चातून त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे पालक वर्गातून देखील कौतुक होत आहे. कट्टीमनी हे नेहमीच शाळेच्या विकासासाठी गुणवत्तेबरोबर पटसंख्या टिकवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.यावर्षी तर त्यांनी विद्यार्थ्यांची बगीतून मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
यावेळी सर्व मुलींना गुलाब पुष्प देऊन गावातून प्रभात फेरी काढून प्रवेशोत्सव कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी गावातील पालक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील,मुलांच्या शाळेचे अध्यक्ष सिद्धू जकापुरे,माजी नगराध्यक्ष तुकप्पा नागुर तसेच शिवचलेश्वर हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका शिल्पा निंबाळे,प्रकाश प्रधान आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या सर्व मुलींना गणवेश व स्कूल बॅग वाटप करण्यात आले. सर्व पालक व मुलींना गोड पदार्थ शिरा व दाल चावल देण्यात आले.उपस्थित सर्व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी माजी मुख्याध्यापिका निंबाळे यांनी मुलींना स्वच्छता व शिक्षण महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवर व उपस्थित माता-पालक वर्ग यांनी शाळेची रंगरंगोटी, परसबाग,पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गणवेश, स्कूल बॅग पाहून समाधान व्यक्त केले.