---Advertisement---

संस्कार प्री स्कुलमध्ये प्रवेशोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा

By team
On: June 19, 2024 2:39 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

संस्कार प्री स्कुलमध्ये प्रवेशोत्सव अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा केला गेला. छोट्या चिमुकल्यांचे स्वागत डॉ. शहाज फाऊंडेशनचे अध्यक्ष. डॉ. विपुल शहा आणि संचालिका रुपाली शहा यांनी शैक्षणीक. साहित्य देवून केले.

तसेच मुलांचे औक्षण अन्नपूर्णा रामशेट्टी व शीतल पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यां करिता विविध प्रकारची आकर्षक खेळणी, सेल्फी पाँईट, विविध गेम्स ,यांची मांडणी केली होती. पालकांकरिता पॅरेंट्स, फीडबैक वॉल करण्यात आली होती. ज्यावर सर्व पालकांनी शाळा व विद्यार्थी यांच्यासाठी आपल्या शुभेच्छा लिहील्या.यावेळी संस्कार प्री स्कूलचा पूर्ण पालक वर्ग व दीपिका मुसळे, शिवाणी लिंबीतोटे , रजनी मंजुळे , निलोफर शेख ,इराणा कल्याणी, राधिका सुरवसे , लक्ष्मी मठपती, निर्मला हरवाळकर उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेचा पहिला दिवस एंजॉय केला. सर्व पालकांनी यावेळी शाळेच्या टीमचे व नियोजनाचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!