---Advertisement---

महायुती सरकारचा महत्वाचा आदेश : पोलीस भरतीत आता ‘या’ उमेदवारांनाही मिळणार संधी

By team
On: September 13, 2025 11:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने नुकतेच तरुणांसह तरुणीना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासनाने आगामी काळात १५ हजार पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी या भरतीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आता याबाबत आणखी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता संबंधित पदासाठी विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनीही पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे.

2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरकारने गुड न्यूज दिली आहे. या उमेदवारांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची आणखी संधी मिळणार आहे. १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला असून यामुळे आता राज्यातील वयोमर्यादा ओलांडलेल्या शेकडो तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे.

खरंतर पोलीस भरती आधी कोरोना आणि नंतर इतर कारणांमुळे रखडली होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला शासनाने सकारत्मकात दर्शवत हा निर्णय घेतला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने पोलीस दलातील 15 हजार 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी 2024 पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे.

भरण्यात येणारी पदे खालीलप्रमाणे  :

पोलीस शिपाई – 10 हजार 908

पोलीस शिपाई चालक – 234

बॅण्डस् मॅन – 25

सशस्त्री पोलीस शिपाई – 2,393

कारागृह शिपाई – 554

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!