---Advertisement---

नव्या वर्षात राष्ट्रवादीला धक्का, बळीरामकाका साठे यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : नव्या वर्षात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.मात्र त्यांनी राजीनामा का दिला हे अद्याप अस्पष्ट आहे.नेमके कारण मात्र समजू शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि ते जेष्ठ नेते आहेत.त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

साठे यांनी आपले राजीनामा पत्र बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे पाठवले आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष श्रेष्टीं साठे यांचा राजीनामा स्वीकारणार का ? स्वीकारले तर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!