---Advertisement---

भारताचा एअर स्ट्राईक : पाकिस्तानातील ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ !

By team
On: May 7, 2025 10:01 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे चालवण्यात आलेले तिन्ही दलांचे हे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारतीय भूमीवरून पार पाडण्यात आले. भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी पहाटे (दि.७) एअर स्ट्राईक केला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्‍हणाले की, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले ऑपरेशनसिंदूर हे प्रत्युत्तर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढ आहे.”

  1. मरकझ सुभान अल्लाह बहावलपूर २. मरकझ तैयबा, मुरीदके ३. सरजल / तेहरा कलान ४. मेहमूना जोया सुविधा, सियालकोट, ५. मरकज अहले हदीस बर्नाला, भिंबर, ६. मरकझ अब्बास, कोटली, 7. कोटली जिल्ह्यातील मस्कर राहील शाहिद, 8.मुझफ्फराबादमधील शवाई नाला कॅम ९. मरकज सय्यदना बिलाल

भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षणाचे अपडेट्स जाणून घ्या…

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!