---Advertisement---

इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य सत्र व श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात

By team
On: August 4, 2025 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

इनरव्हील क्लब अक्कलकोटच्यावतीने पदग्रहण सोहळा, गर्भाशयाच्या कॅन्सरवरील आरोग्य जनजागृती सत्र आणि अष्टपैलू श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अनुराधा चंडक यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. प्रमुख अतिथी म्हणून दीपा पवार व अर्चना जाजू उपस्थित होत्या.

आरोग्य सत्रात डॉ. सुवर्णा मलगोंडा व डॉ. सुमा मलगोंडा यांनी महिलांना कॅन्सरबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मंजूषा मेंथे व कु. मल्लम्मा पसारे यांनी केले. परीक्षक म्हणून पूनम कोकळगी व सोनिया चंकेश्वरा होत्या. स्पर्धेत कु. विनीता बिराजदार (मिस श्रावण क्वीन), तनिष्का शहा (मिसेस श्रावण क्वीन), तसेच कु. अक्षता मुसळे, कु. श्वेता कदम, कु. आफिया शेख, कु. विद्या मंजुळे, मयुरी टोणे, सृष्टी मसुते,अनुजा कूँपे, शीतल पवार, अनुजा शहा यांना विविध पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रुपाली शहा, अहवाल वाचन सलोनी शहा, वृत्तांत लेखन चंचल जाजू, सूत्रसंचालन प्रीती रणसूभे व कु. युगा शहा यांनी केले. सुचित्रा साखरे यांनी आभार मानले. शीला माशाळे, सुरेखा माशाळे, कीर्ती हिंडोळे, पवित्रा मलगोंडा,कला पटेल यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि उत्तम नियोजनात
पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!