अक्कलकोट, दि.२६ : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या आदेश क्रं.२०२१/डीसीबी/२/आर आर ४८८६ दि. २५ /१० / २०२१ नुसार गठीत केलेल्या भरारी पथकाकडून आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगरच्या काट्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली. यात सर्व वाहनकाटे अचूक व योग्य रितीने कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले.
तत्पूर्वी भरारी पथकाचे प्रतिनिधी विठ्ठल जाधव यांनी कारखाना प्रतिनिधींच्या सोबतीने कारखाना स्थळावरील सर्व वाहनकाटे शेतकऱ्यांसमक्ष तपासली. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी वजनकाटे अचूक वजन दर्शवितात की नाही? याबाबत सर्व ऊस पुरवठादार शेतकरी, वाहनचालक,वाहतुक ठेकेदार आदींना प्रात्यक्षिक दाखविले असता सर्वांनी काही तक्रार नसल्याचे सांगितले.
यानंतर जयहिंदच्या वजन काट्याचा अहवाल अचूक असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक गेटमे ए.डी,निरीक्षक बालाजी नांदे,सह.संस्थेचे लेखापरीक्षक किशोर घायफूले,शेतकरी प्रतिनिधी नानासाहेब पाटील, मल्लिनाथ ख्याडे, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आदींकडे सुपूर्द करण्यात आले. यावर सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या.
दरम्यान यंदाच्या गळीत हंगामात जयहिंद शुगरकडून आतापर्यंत ४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य
गेल्या अनेक वर्षांपासून जयहिंद शुगर्सच्या माध्यमातुन समाजोपयोगी कार्यक्रमासह शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य सुरू आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऊसाचा पुरवठा सुरू आहे.ही बाब जयहिंदच्या प्रामाणिक कार्याची पोचपावती आहे.यापूढील काळात कारखान्याची वाटचाल सर्वांच्या हितासाठी असेल – गणेश माने देशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर