---Advertisement---

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

By team
On: June 9, 2025 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

मराठी पत्रकार संघ आयोजित ‘जीवनगौरव व राजस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा’ सोलापुरातील बालाजी सरोवर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जन्मेजयराजे भोसले महाराज यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हा सन्मान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, मनीष केत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून जन्मेजयराजे भोसले महाराज अक्कलकोट येथे येणाऱ्या हजारो भाविकांना निस्वार्थ अन्नदान सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!