---Advertisement---

जरांगे पाटलांनी केली निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात ; फडणवीस आमचे शत्रू नाही !

By team
On: September 3, 2024 9:57 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. दरम्यान मनोज जरांगे पाटिल यांनी श्री. क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आपल्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विविध मंदिरांना भेटी दिल्या, तसेच आशीर्वाद घेतले. मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात वाईट भावनाही नाहीत. पण त्यांच्या मराठाद्वेषी वागण्यामुळे भाजपमधील मराठा आमदारही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या मनात फडणवीसांविषयी खदखद आहे. माझ्या आजूबाजूला मीडियावाले नसताना हे आमदार मला येऊन भेटतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. विधानसभेला मविआ, महायुतीच्या नाराज इच्छुकांना सोबत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भीमाशंकरला जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

या वेळी मनोज जरांगे म्हणाले की, भाजपचे आजी-माजी आमदार मला येऊन भेटतात. मराठा आमदारांना वेळ न देणे, त्यांचे प्रश्न ऐकून न घेणे यामुळे आमदारांमध्ये प्रचंड खदखद आहे. फडणवीसांकडे इतर पक्षांच्या आमदारांना भेटायला वेळ आहे, पण मराठा समाजाच्या आमदारांना ते भेटत नाहीत. भाजपमधील मराठा आमदारांनाच आमच्या अंगावर सोडण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. आमचेच लोक आमच्या अंगावर घालून आरक्षण देणार नसाल तर मात्र तुमचे राजकारण उघडे केल्याशिवाय राहणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!