---Advertisement---

जरांगे पाटलांची मोठी घोषणा : विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार

By team
On: August 6, 2024 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी आता एक मोठी घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही. मात्र सरकारने आता आरासखान न दिल्यास दुसरा पर्याय नाही. आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच राज्यभरातील मराठा समाजाच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. समाजाने संयम धरला पाहिजे. सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचे काम सुरू आहे. सर्व जण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. मग ते भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार, हे सर्व षडयंत्र आहे. आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षडयंत्र आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

पुढे जरांगे म्हणाले, कारण नसताना वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी काहीही बोलले तरी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही. ज्या दिवशी जाब विचारायचा असे वाटेल त्या दिवशी सामाज काय करतो हे बघा असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच येणाऱ्या विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यातील मराठा आमदारांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, ”सगळ्याच पक्षातील मराठ्यांच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगवे. आम्हाला राजकारणात जायचे नाही. त्यात आम्हाला ढकलू नका. ही सरकारला शेवटची संधी आहे. कारण आरक्षण देण्याचे केंद्र सत्ता असते. सध्या सत्ता त्यांची आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. 29 तारखेला याबाबत निर्णय होईल. मराठा समाजाला हीच राजकारणाला पायाखाली तुडवायची योग्य वेळ आहे असे वाटले तर निर्णय होईलच. कारण आमचाही नाईलाज असेल”, असे जरांगे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!