---Advertisement---

‘आणखी एक महादिवाळी होणार’ जरांगे पाटलांचे मोठं वक्तव्य

By team
On: January 31, 2024 3:16 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. पण सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्वच मागण्या मान्य केल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील निघाले आहेत. आज मनोज जरांगे पुण्यात पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आता आणखी एक महादिवाळी होणार, असं म्हणत कायदेशीर कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी शक्यता मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या टीकेलाही रोखठोक उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘गेल्या ७०-७५ वर्षातील मराठा समाजासाठीचा सर्वात मोठा कायदा झाला आहे. आता आणखी एक महादिवाळी होणार आहे. कायद्याच्या आधारे पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक मोठी जंगी सभा होणार आहे’. ‘प्रामाणिक आंदेलन आणि नेतृत्व कराण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ⁠२०-२२ वर्षापासून समाजाचे काम करत आहे. ⁠येवल्याच्या माणसाने महटले, मी पाचवी शिकलो आहे. पण मी १२ शिकलो आहे. मी किती शिकलो हे शोधण्यात सरकारने तीन-चार दिवस घालवले आहे. ⁠आरक्षणावर तत्काळ उपाय शाधण्याचा प्रयत्न केला आहे. ⁠आधी गोदा पट्ट्यातील १२३ गावे एकत्र केले, असे जरांगे पाटील म्हणाले. ‘लाठीहल्ल्याला आम्ही टर्निंग पॉइंट म्हणू शकत नाही. आमच्या आया-बहिणींना मारहाण झाली. ⁠आम्हाला धिंगाणा करायचा असता तर, पहिल्याच दिवशी केला असता. ⁠लाठीहल्ला होण्यासाठी तीन दिवस वाट का पाहिली असती? ⁠एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी माझे कौतुक केले, असेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!