---Advertisement---

मंत्री भुजबळांच्या विधानावरून जरांगे पाटलांचा पलटवार !

By team
On: September 5, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहोत. मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता. मात्र, छगन भुजबळ 1989 मध्ये आरक्षणात आले आहेत. आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो. आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचे असेल, समाजाला पुढे न्यायचे असेल तर आम्हाला आरक्षण घ्यावे लागणार आहे. हे आमच्या आता लक्षात आले असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार विलास भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मराठा समाजाची ओबीसी समाजात घुसखोरी म्हणता येणार नाही. याला अधिकृत प्रवेश म्हणता येईल. आता मराठा समाज अधिकृतपणे ओबीसी समाजात गेला आहे. येवल्यातील माणसाचा बोलण्याचा रोख वेगळा आहे. अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे.

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन बळीचा बकरा केला आहे. हे त्यांना माहिती होते. मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे, हे त्यांना माहिती होते. वास्तविक मराठे हे सरसकट आरक्षणात गेले आहेत. मात्र आता आपल्या समाजातील लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. करोडोच्या संख्येने मराठा समाजातील लेकर मुंबईला गेले. त्यामुळे विजय घेऊन परत आले असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने जीआर काढण्यात आला आहे. ओबीसीत मराठा समाजाला घालण्यासाठी हा जीआर पारित करण्यात आला आहे. आता केवळ अंमलबजावणी बाकी आहे. वास्तविक सर्व मराठा समाजा ओबीसी मध्ये गेला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

इतर मराठा नेते माझ्या विरोधात का जातात? हे मला माहिती नाही. मात्र आमचा हक्क आम्ही मिळवला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा हे सर्वच आरक्षणात गेले आहेत. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी झुंजत आहोत. माझी मुले- बाळे करोडोच्या संख्येने मुंबईला गेले आणि विजय घेऊन परत आले आहेत. ते काही नुसते लेखी नाही तर याला जीआर म्हणतात, असे देखील जरांगे पाटील यांनी सुनावले आहे.

छगन भुजबळ यांचा जीआर चांगला कळतो. त्यांनी एक दोन मोठे पक्ष हाताळलेले आहेत. बहुमताच्या काळात सत्ता हाताळली आहे. कॅबिनेट देखील मंत्री होते. त्यामुळे त्यांना जीआरचा चांगला अभ्यास आहे. वास्तविक ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याने ओबीसी समाजाचे नेते हे आक्रमक भूमिका घेताना दिसत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र जीआर अगोदरच निघाला आहे. आता केवळ त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!