---Advertisement---

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन साजरा

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.५ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सोलापूर येथील जिल्हा कार्यालयात महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले ,नागनहळ्ळी आश्रम शाळेचे अध्यक्ष जावेद पटेल यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, दलित मित्र पुरस्कार व अश्विनी मेडिकल कॉलेजचे संचालक अशोक लांबतुरे, ॲड. प्रशांत कांबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिंदे, महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक कांबळे व बनसोडे, वसंतराव नाईक महामंडळाचे गायकवाड व संत रोहिदास महामंडळाचे रेश्मा लोखंडे तसेच सामाजिक कार्यकर्त उपस्थित होते.संत रोहिदास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार यांच्यावतीने वसुली अधिकारी अविनाश चाबुकस्वार यांनी महामंडळाकडे चालु असलेल्या योजनेची माहिती सांगितली व या योजना तळगळात पोहचविण्याचे आवाहन केले.प्रास्ताविकात अश्विनी मेडिकल कॉलेजचे संचालक लांबतुरे यांनी महामंडळ स्थापने पासुनची माहिती दिली. तर आभार वसुली अधिकारी अविनाश चाबुकस्वार यांनी मांडले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!