ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जय हिंद यंदा १० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार : गणेश माने देशमुख:कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

 

अक्कलकोट, दि.१७ : अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य वाटचालीसाठी सर्वाधिक जबाबदार घटक म्हणून बळीराजांकडे पाहिले जाते.
बळीराजाला वर्षभर अनेक संकटातुन जावे लागते.त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला अनमोल महत्व आहे म्हणून जयहिंद परिवार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर
झटत आला आहे.यापूढील काळातदेखील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणार असल्याचे प्रतिपादन जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने माने देशमुख यांनी व्यक्त केले.
आचेगांव (ता. दक्षिण सोलापूर )येथील जयहिंद शुगर्सच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख होते.तर व्यासपीठावर उत्तर सोलापूर कॉंग्रेस अध्यक्ष शालिवाहन माने देशमुख, विक्रमसिंह पाटील,सोमनाथ माने देशमुख,राजेंद्र देशमुख,सरपंच विश्रांती पाटील,उपसरपंच रफिक मुल्ला,रमेश क्षीरसागर,भगवान गोतसुर्वे,मंगल गोतसुर्वे,राजवर्धन मोरे,राजकुमार चव्हाण,शेतकी अधिकारी चंद्रशेखर जेऊरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला होमहवन, सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.यानंतर बाॅयलर अग्नीप्रदीपनाचा कार्यक्रम पार पडला.पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की, जयहिंद शुगर्सने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.आजवर ऊस उत्पादकांनी जयहिंद परिवाराला सहकार्य केले आहे.यापूढील काळात देखील बिले वेळेवर देण्याबरोबरच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊन देणार नाही अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी अक्कलकोट, द.सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.वेदोपचार वेदमुर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.

 

१० लाख मेट्रिक टन
ऊस गाळपाचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने जयहिंद परिवारावर प्रेम केले आहे.त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करणार आहोत.१० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!