---Advertisement---

अरे बाप रे … हे काय आता ! कलबुर्गी जिल्हा प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि. २३ : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करुनच प्रवेश करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी नागरिकांना केले आहे. कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. तसेच अगदीच अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करु नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्क नेहमी वापरावा, सैनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!