ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाजार समितीनंतर आमदार कल्याणशेट्टी, म्हेत्रे प्रचारासाठी कर्नाटकात;स्टार प्रचारकांच्या यादीत दोघांचाही समावेश

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट व
दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे आता कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत.
मागच्या पंधरा दिवसापासून हे दोन्ही नेते बाजार समितीच्या निवडणुकीत व्यस्त होते.याच दरम्यान कर्नाटकामध्येही निवडणुका लागल्या आहेत.कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातून स्टार प्रचारक म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष
सचिन कल्याणशेट्टी हे प्रचारासाठी गेले आहेत.या दोन्ही नेत्यांच्या जनसंपर्काचा फायदा निवडणुकीसाठी व्हावा,हा त्या पाठीमागचा उद्देश आहे.यादृष्टीने निकाल लागताच हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत.नेत्यांच्या सोबत तालुक्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्तेही पोचले आहेत.अक्कलकोट तालुका हा राज्याच्या दृष्टीने टेल एंड आहे या ठिकाणच्या राजकारणावर कर्नाटकच्या नेत्यांचा प्रभाव आहे तर कर्नाटकमधील सीमावर्ती भागातील जिल्ह्यावर या भागातील नेत्यांचा प्रभाव आहे. निवडणुकीच्या दरम्यान या दोन्ही भागातील नेते हे आपापल्या समर्थकांच्या प्रचारासाठी येत असतात आणि पक्षाकडूनही त्यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात येते पुढील पाच ते सहा दिवस हे दोन्ही नेते कर्नाटकमध्येच राहणार असून आपल्या आपल्या पक्षाच्या विजयासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील वातावरण देखील सध्या थंड आहे.

वातावरण अस्थिर तरीही
कर्नाटकात प्रचार

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद
पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण अस्थिर असताना विविध नेते मंडळी हे कर्नाटकामध्ये जाऊन प्रचार करत आहेत.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकचे आहेत. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक चुरशीची बनली आहे.भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!