---Advertisement---

स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संजीवकुमार पाटील तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ भरमशेट्टी

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट दि.८:- दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदी संजीव सिद्रामप्पा पाटील तर व्हा चेअरमन पदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. सहायक म्हणून विध्याधर माने यांनी काम पाहिले.
सोमवारी दुपारी ४ वाजता कारखाना कार्यस्थळावर निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलवण्यात आले होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यावेळी माजी चेअरमन,संचालक सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, दिलीप पाटील, आप्पासाहेब पाटील, उत्तम वाघमोडे, श्रीमंत कुंटोजी, भीमाशंकर धोत्री, संजीवकुमार अ. पाटील, महेश पाटील, दिलीप शावरी, गिरीजा विजापुरे, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, शिवप्पा बसरगी, महानंदा निंबाळ, मल्लिकार्जुन बिराजदार, भरमनाथ भुताळी, कार्यकारी संचालक अशोक मुलगे आदीजण उपस्थित होते. निवड जाहिर होताच नूतन पदाधिकारी यांचे सन्मान करण्यात आले. सूत्रसंचालन अशोक वर्दे तर आभार मल्लिनाथ भासगी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!