---Advertisement---

लातूरमध्ये भीषण अपघात.. एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

By team
On: November 7, 2024 8:43 PM
Follow Us:
---Advertisement---

लातूर वृत्तसंस्था 

लातूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. लातूरमध्ये वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर महामार्गावरील एकुरका गावाजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जखमींना उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या दावणगावात भंडे कुटुंब वास्तूशांतींच्या कार्यक्रमासाठी एकुरका रोड या ठिकाणी गेले होते. या भागातील कार्यक्रम आटोपून निघताना एकुर्का ते इस्लामपूरदरम्यान दोन गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मंगलाबाई जाधव, प्रणीता बिरादार, प्रतिभा भंडे, अनन्या भंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संजय भंडे, सई आणि आदिती भंडे या हे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!